गटनेते पदी शिंदे यांच्या निवडीनंतर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

4306
aditya-thackeray-mhada

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार, समर्थक प्रहार जनशक्ती पक्ष आणि अपक्ष आमदारांची बैठक गुरुवारी शिवसेना भवन येथे दुपारी 12 वाजता पार पडली. या बैठकीत शिवसेना विधिमंडळ नेत्याची निवड करून घोषणा करण्यात आली.

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रस्ताव ठेवल्यानंतर शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली. तर आमदार दादा भुसे यांच्या प्रस्तावाला पाठिंबा देत सुनील प्रभू यांना विधानसभेत शिवसेनेचे पक्षप्रतोद म्हणून निवडण्यात आले.

एकनाथ शिंदे आणि सुनील प्रभू यांची निवड झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून ट्वीट करत ही माहिती दिली आहे. तसेच निवडून आलेला एक आमदार म्हणून विधिमंडळाच्या गटनेते पदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्याचा अधिकार आपल्याला मिळाला हे माझे भाग्य समजतो, असेही त्यांनी या ट्वीटमध्ये नमूद केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या