गावपातळीवर शिवसेनेची बांधणी जोमाने करा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

शिवसेनेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी सर्वांना विश्वासात घेवून गावपातळीवर शिवसेनेची बांधणी जोमाने करण्याचे आवाहन तसेच नांदेड लोकसभेवर व सर्व विधानसभा मतदारसंघात भगवा फडकविण्यासाठी सज्ज रहावे, असे आवाहन शिवसेनेचे संपर्कप्रमुख आनंद जाधव यांनी केले.

सोमवारी नांदेडच्या शासकीय विश्रामगृहात सह्याद्री हॉलमध्ये नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिणच्या पदाधिकारी व कार्यकत्र्यांचा मेळावा संपन्न झाला. त्यावेळी ते मार्गदर्शन करत होते. यावेळी शिवसेना आमदार हेमंत पाटील, लोकसभा संघटक डॉ.मनोज भंडारी, जिल्हा समन्वयक धोंडू पाटील, सहसंपर्कप्रमुख प्रकाश मारावार, प्रकाश कौडगे, भुजंग पाटील, जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे, उमेश मुंढे, आनंद पाटील बोंढारकर, जिल्हा संघटक दयाल गिरी, शेख अफजल, उपजिल्हाप्रमुख प्रमोद उर्फ बंडू खेडकर, प्रदीप जाधव, गणेश मोरे, महानगरप्रमुख अशोक पाटील उमरेकर, शहरप्रमुख सचिन किसवे, तुलजेश यादव, निवृत्ती जिंकलवाड, महिला आघाडीच्या निकिता चव्हाण, नगरसेवक बालाजी कल्याणकर, तालुकाप्रमुख व्यंकोबा येडे, शहर समन्यक अवतारसिंह पहरेदार, युवासेनेचे माधव पावडे, महेश खेडकर, जयवंत कदम, नेताजी भोसले, अशोक मोरे, किशन फटाले, विजय बगाटे, मुकुंद जवळगावकर, तालुका संघटक नवनाथ काकडे आदींची यावेळी उपस्थिती होती.

शिवसेनेची नवी कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. आनंद जाधव म्हणाले की, दसरा मेळाव्यासाठी आपापल्या भागातून जास्तीत जास्त शिवसैनिकांना आणावयाचे आहे. पक्षाने दिलेल्या पदाचा वापर हा जनसामान्यांची कामे आणि पक्ष वाढीसाठी करावयाचा आहे. येत्या सहा महिन्यात सर्वांच्या कामांचा आढावा घेण्यात येईल. प्रत्येकाने आपला मासिक अहवाल तयार करुन पाठवायचा आहे. प्रत्येकांच्या कामाचे वाटप ठरवून देण्यात येईल. येणाऱ्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीसाठी गावपातळीवर नावनोंदणी, मतदारांची यादी अध्यावत करणे तसेच शिवसंपर्क अभियानातंर्गत शिवसैनिकांची नोंदणी या कामाकडे सर्वांनी लक्ष दिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

आमदार हेमंत पाटील यांनी आपल्या मनोगतात सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करुन प्रत्येकांनी आपले काम प्रामाणिक करुन पक्ष वाढविण्यासाठी जोमाने कामाला लागावे. तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार असून, समाज कार्याच्या माध्यमातून शिवसेनेच्या कामाचा वेगळा ठसा जनमानसात निर्माण करा, असे आवाहन केले. याप्रसंगी सचिन किसवे, अशोक उमरेकर, दत्ता कोकाटे, धोंडू पाटील आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.