शिवसेना आमदार रमेश लटके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील अंधेरी पूर्व विधान सभा मतदार संघातील विद्यमान शिवसेना आमदार रमेश लटके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. आमदार रमेश लटके कुटुंबियांसह दुबईला गेले होते, तिथेच त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचे निधन झाले आहे.

आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. आमदार रमेश लटके यांचे पार्थिव मुंबईत आणण्याची तयारी सुरू असून लवकरच त्यांचे पार्थिव मुंबईत आणले जाणार आहे. ते अंधेरी पूर्व विधान सभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार होते. सलग दोन टर्म रमेश लटके हे शिवसेनेचे आमदार राहिले आहेत.