नागपूर शहरातील शिवसेना पदाधिकारी जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नागपूर शहरातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

महानगरप्रमुख – किशोर कुमेरिया (नागपूर महापालिका), शहरप्रमुख – हरिभाऊ बानाईत (नागपूर पूर्व, नागपूर उत्तर), विक्रम राठोड (नागपूर दक्षिण, नागपूर दक्षिण पश्चिम), संदीप पटेल (नागपूर मध्य, नागपूर पश्चिम), उपशहरप्रमुख – महेंद्र कठाणे, शंकर थूल, राजू दळवी, पंकज अहिरराव, निखिल जाजुलवार, अभिषेक देशमुख.

रामटेक लोकसभा सहसंपर्कप्रमुखपदी प्रमोद मानमोडे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नागपूर जिह्यातील रामटेक लोकसभाकरिता सहसंपर्कप्रमुखपदी प्रमोद मानमोडे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती कळविण्यात आली आहे.