भंडारा जिह्यातील शिवसेना पदाधिकारी जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने भंडारा जिह्यातील शिवसेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्याबाबतची माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

सहसंपर्कप्रमुखपदी नरेश डहारे यांची नियुक्ती करण्यात आली असून जिल्हाप्रमुखपदी संजय रेहपाडे (तालुके – भंडारा, पवनी, लाखांदूर), अॅड. रवी वाढई (तालुके – तुमसर, मोहाडी, साकोली, लाखनी) यांच्या तर जिल्हा समन्वयकपदी सुधाकर कारमोरे (भंडारा जिल्हा), जिल्हा संघटकपदी लवकुश निर्वाण (भंडारा जिल्हा) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.