वाटद एमआयडीसी होऊ देणार नाही – उदय सामंत

582

वाटद येथील प्रस्तावित एमआयडीसीला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध आहे. शिवसेना नेहमीच स्थानिक ग्रामस्थांच्या पाठीशी राहिली आहे. वाटद ग्रामस्थांच्या पाठिशी आम्ही आहोत. त्यामुळे वाटद येथील एमआयडीसी रेटण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही आंदोलन छेडू असा इशारा शिवसेना उपनेते, आमदार उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिला.

आमदार सामंत म्हणाले की,एमआयडीसी बाबत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केलेल्या विधानानंतर वाटद परिसरात संभ्रम निर्माण झाला आहे. स्वत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी वाटद एमआयडीसीला स्थगिती दिल्याचे जाहिर केलेले असताना अधिकाऱ्यांनी त्याबाबत माहिती घेऊन बोलायला हवे. जेव्हा मार्गता म्हाणे एमआयडीसी होणार होती तेव्हा स्थानिकांनी तिला विरोध केला होता तसाच विरोध वाटद स्थानिकांचा आहे. त्यामुळे मार्गता म्हाणे यांना एक न्याय आणि वाटदला वेगळा न्याय कसा असा सवाल सामंत यांनी केला.

वाटद ग्रामस्थांच्या आम्ही पाठीशी आहोत.वेळ पडल्यास शिवसेना आंदोलन छेडेल असा इशारा आमदार सामंत यांनी दिला.यावेळी तालुकाप्रमुख प्रदीप साळवी आणि एमआयडीसीचे अधिकारी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या