उद्धव ठाकरे यांचे नांदेडमध्ये आगमन, शिवसैनिकांनी केले जंगी स्वागत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विजय जोशी, नांदेड

गद्दारांच्या दगा फटक्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नांदेडला पहिल्यांदाच आगमन झाले. मात्र पहिल्यापेक्षा अधिक उत्साह, जल्लोष प्रचंड गर्दी आणि जल्लोषाच्या घोषणाबाजीने त्यांचे नांदेड शहर आणि जिल्ह्यात उत्स्फुर्त स्वागत झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा विजय असो, उध्दव ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है या घोषणांनी नांदेडचा परिसर दणाणून गेला.

आज सकाळी 11.35 वाजता नांदेड विमानतळावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे आगमन झाले. त्यांच्या समवेत शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हेही होते. विमानतळावर आल्यानंतर परिसरात प्रचंड फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. सकाळी साडेदहा वाजल्यापासूनच विमानतळाच्या बाहेर ढोल ताश्यांचे गजर तसेच शिवसैनिकांच्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. तत्पूर्वी विमानतळावर त्यांचे प्रमुख पदाधिकार्‍यांनी स्वागत केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)


मराठवाडा विभागीय अशोक पटवर्धन, माजी खासदार सुभाष वानखेडे, आमदार राहुल पाटील, माजी आमदार रोहिदास चव्हाण, जिल्हाप्रमुख माधव पावडे, जिल्हाप्रमुख प्रमोद उर्फ बंडू खेडकर, जिल्हा संघटक नेताजी भोसले, सहसंपर्कप्रमुख भुजंग पाटील, दत्ता कोकाटे, प्रकाश मारावार, डॉ.मनोज भंडारी, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब देशमुख, बाळासाहेब कर्‍हाळे, डॉ.बी.डी.चव्हाण, युवासेनेचे जिल्हा युवाधिकारी गजानन कदम, बालाजी पाटील शिंदे, शहरप्रमुख गौरव कोडगिरे, अर्जुन ठाकूर, परभणीचे डॉ.विवेक नावंदर, उपजिल्हाप्रमुख संजय गाडगे, संभाजी ब्रिगेडचे संकेत पाटील व त्यांचे सर्व सहकारी सोबतच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

विमानतळावर मर्यादीत प्रवेश असल्याने विमानतळाच्या बाहेर शिवसैनिकांनी अभूतपूर्व गर्दी करत उद्धव ठाकरे यांचे स्वागत केले. विमानतळाच्या बाहेर पडल्यानंतर त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. जवळपास चाळीस मिनिटे ही पुष्पवृष्टी करुन फटाक्याच्या आतिषबाजीसह ढोल ताश्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. असंख्य शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक, महिला, युवा कार्यकर्ते यांची प्रचंड गर्दी होती. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा विजय असो, उध्दव ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है या घोषणांनी सबंध परिसर दणाणून गेला. विमानतळाच्या बाहेर तब्बल एक तास शिवसैनिकांचा जल्लोष सुरू होता. त्यानंतर त्यांचे पिंपळगाव, अर्धापूर, पार्डी याठिकाणीही स्वागत झाले.