रातोरात छत्रपतींचा पुतळा हटवणाऱ्या कर्नाटक सरकारच्या प्रतिमेचे शिवसेनेकडून दहन

1012

मराठी जनतेसह तमाम हिंदुस्थानचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान कर्नाटक सरकारने केला आहे. शिवरायांचा पुतळा पुन्हा सन्मानाने पूर्ववत आहे त्या जागी विराजमान करा, अन्यथा कर्नाटकात येवून मस्ती जिरवू, असा इशारा आज राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी कर्नाटक सरकारला दिला आहे.

मनगुत्ती, ता.हुक्केरी, जि. बेळगांव येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात काढणा-या कर्नाटक सरकार विरोधात कोल्हापूराही संतप्त पडसाद उमटले. येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात  शिवससैनिकांनी कर्नाटकी सरकारच्या प्रतिमेचे दहन करुन तीव्र निषेध केला.

कानड्यांची दादागिरी! छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवला, शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट

आपली प्रतिक्रिया द्या