
डिसेंबर महिन्यापासून दक्षिण नागपूरच्या जनतेला पाणी टंचाईचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून जनतेमध्ये प्रचंड रोष आहेत. त्यामुळे आज जनतेला 24 तास पाणी मिळावे यासाठी नागपूर शिवसेनेने भाजप विरोधात मटका फोडो आंदोलन केले.
शिवसेने तर्फे नेहरू नगर झोन क्रमांक 5 मनपा चे सहआयुक्त अशोक पाटिल व ओसीडब्ल्यूच्या नायक यांना घेराव घालत मटका फोडो आंदोलन केले. यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख नितिन तिवारी यांनी ओसीडब्ल्यूंवर जनतेत भेदभाव केल्याचा आरोप केला. ”गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच भागात फक्त 45 मिनीटं अत्य़ंत कमी धारेचं पाणी येते. त्यामुळे लोकांना पुरेसं पाणी मिळत नाही. टँकरची संख्या कमी असल्याने पाण्याची मागणी पूर्ण होत नाहीए. त्यामुळे सध्या जनता वैतागली आहे. ताजबाग भागात नळाच्या पाण्यात गटाराचे दुषित पाणी मिसळल्याने जनतेला घाणेरडे पाणी प्यावे लागत आहे. गेली 15 वर्ष भाजप नागपूरकरांना 24 तास पाणी देण्याचे स्वप्न दाखवत सत्तेत येत आहे. ते जनतेला मूर्ख बनवत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभा मतदार संघ सोडला तर इतर नागपूर शहरावर का लक्ष दिले जात नाही”, असा सवाल शहर प्रमुख नितीन तिवारी यांनी यावेळी केला आहे.
शिवसेना संपर्क प्रमुख दुष्यंत चतुर्वेदी यांच्या मार्गदर्शनात शहर प्रमुख नितिन तिवारी व माजी नगरसेविका मंगला गवरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी शहर प्रमुख दीपक कापसे, जिल्हा संघाटिका शुशीला नायक , सुरेखा खोब्रागड़े व शाखा प्रमुख गौरव मोहोड़ उपस्थित होते. यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख शशिधर तिवारी ,प्रीतम कापसे, मुन्ना तिवारी,हरिभाऊ बनाइत,नाना झोडे , विशाल कोरके,अंकुश भोवते, हरीश रामटेके, मुकेश रेवतकर, दीपक पोहनेकर, राजेश वाघमारे, भोला पटेल,किशोर धोटे,पंकज कुंभलकर,संजय गुप्ता,ज्ञानलता गुप्ता, चेतन कश्यप, मीना अड़कने, वैशाली खराबे,सतीश भूरे,साबिर खान, भूपेन्द्र कटाने,दिलीप पाल , सुरेंद्र आंबिलकर,शैलेंद्र, आंबिलाकार,आकाश पांडे, पवन घुगगुस्कर, विशेष मनचलवार,आशीष हाड़गे,अब्बास अली,ललित बावनकर,रमेश पवार व मोठ्या संख्येने शिवसैनिक या आंदोलनात सहभागी झालेल होते.