विधानभवनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र विधानभवनात लावण्यात येणार आहे. राज्य सरकारने याबाबतचा प्रस्ताव आज विधानसभेत पारित करण्यात आला. भवनातील मध्यभागी हे तैलचित्र लावण्यात येणार आहे.

या तैलचित्राचा अनावरण सोहळा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी म्हणजेच 23 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता विधानभवन येथे आयोजित करण्यात आला आहे.