शिवसेनेकडून गणेशभक्तांना अनोखी भेट

गणेशोत्सवामध्ये गणपती बाप्पाच्या पूजेसाठी लागणाऱया साहित्याचे वाटप शिवसेनेच्या वतीने ठिकठिकाणी करण्यात येत आहे. याशिवाय काही विभागात कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी बसची व्यवस्था करण्यात आली. गणेशभक्तांचा या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे.

शिवसेना अंधेरी पश्चिम विधानसभेत गणेशपूजा साहित्याचे वाटप करण्यात येणार असून या उपक्रमाचा शुभारंभ विभागप्रमुख-आमदार अॅड. अनिल परब यांच्या उपस्थितीत करण्यात आला. अंधेरी पश्चिम विधानसभा संघटक संजय मानाजी कदम, रमेश वांजळे यांच्यामार्फत वाटप करण्यात येणार आहे. या वेळी शाखाप्रमुख दीपक सणस, माथाडी सेना अध्यक्ष राजेश नारकर, डॉ. उजय जाधव आदी उपस्थित होते.

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष शीव विधानसभेचे कक्ष संघटक सुशील कुमार सुंकी यांच्या संकल्पनेतून साकारलेले श्री गणेश आरती संग्रहाचे प्रकाशन शिवसेना नेते खासदार, कक्षाचे अध्यक्ष अनिल देसाई यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी शीव विधानसभाप्रमुख गोपाळ शेलार, उपविभागप्रमुख-शिवसेना ग्राहक कक्षाचे सचिव राजेश कुचिक, सचिव निखिल सावंत, कक्ष संघटक सुशील सुंकी, शेखर यादव यांच्यासह सहनिरीक्षक सुरेश काळे उपस्थित होते.

शिवसेना शाखा क्र. 217 चे शाखाप्रमुख शशिकांत पवार यांच्या वतीने विभागातील 400 घरगुती गणपतीसाठी गणेश पूजा साहित्य वितरण करण्यात आले.