
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मुख्य प्रतोद आणि आमदार सुनील प्रभू यांचे वडील वामन प्रभू यांचे आज निधन झाले. ही बातमी समोर आल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी शोक व्यक्त केलं आहे. X वर एक पोस्ट करत ते म्हणाले आहेत की, “शिवसेना नेते, आमदार सुनील प्रभू यांचे वडील वामन प्रभू यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो व प्रभू कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. आम्ही प्रभू कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली.”