BMC Result 2026 – मुंबईत प्रभाग 203 मधून शिवसेनेच्या श्रद्धा पेडणेकर विजयी

मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या मतमोजणीत प्रभाग क्रमांक २०३ (F/South विभाग) मधून शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) श्रद्धा श्रीधर पेडणेकर यांनी विजय मिळवला आहे.

श्रद्धा पेडणेकर यांना ६ व्या आणि अंतिम फेरीनंतर एकूण १६,५४१ मते मिळाली आहेत. हा प्रभाग महिला आरक्षित असून त्यांनी येथे मिंधे गटाच्या समिधा संदीप भालेकर यांचा पराभव केला आहे.

या प्रभागात एकूण ५ उमेदवार रिंगणात होते, ज्यात मुख्य लढत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मिंधे गटात होती. श्रद्धा पेडणेकर यांच्या या विजयाने मुंबईत शिवसेनाला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महत्त्वाची जागा मिळाली आहे.