
धाराशिवच्या कळंबमधील पूरग्रस्तांना ठाण्यातील शिवसैनिकांनी थेट मदतीचा हात दिला आहे. सातेफळ, सौंदन डोकी, शेलगाव, दहिफळ, बाभळगाव, पानगाव, रत्नापूर, जवळा तसेच अन्य गावांमध्ये सणासुदीच्या तोंडावर ही मदत मिळाल्याने शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व माजी खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर या शहरांमधून मदतीचा ओघ सुरू आहे. कपडे, अन्नधान्याचे किट, औषधे व अन्य जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सुरू करण्यात आले असून पूरग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पोशिंद्याची दिवाळी गोड करण्यासाठी ठाणे लोकसभा पाटील, मीरा-भाईंदरचे मतदार संघातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. शिवसेना नेते राजन विचारे हे स्वतः थेट धाराशिव जिल्ह्यात घरोघरी जाऊन मदत पोहोचवत आहेत. यावेळी संपर्कप्रमुख नरेश मणेरा, धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख आमदार कैलास जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, प्रकाश पाटील, प्रवीण म्हात्रे, शहरप्रमुख अनिश गाढवे, उपशहरप्रमुख प्रदीप शेंडगे, विभागप्रमुख प्रतीक राणे, दत्ता पागवले, सचिन गोरिवले, स्वप्निल शेरकर, संतोष डंगारे, युवासेनेचे पदाधिकारी जतिन, साई सावंत, शिव आरोग्य सेनेचे डॉक्टर प्रशांत भुईंबर तसेच धाराशिव जिल्ह्यातील विजय सस्ते, कळम तालुकाप्रमुख सचिन काळे, युवासेना जिल्हाप्रमुख रवी वाघमारे, उपजिल्हाप्रमुख सागर बाराते आदी उपस्थित होते.
आरोग्य शिबिराला प्रतिसाद
कळंब तालुक्यातील दहिफळ येथे शिव आरोग्य सेनेच्या वतीने आरोग्य आले. ५०० हून अधिक रुग्णांना त्याचा लाभमिळाला. ठाण्यावरून गेलेल्या डॉक्टरांच्या पथकाने शेतकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली. तसेच दूषित हवामानामुळे संसर्गजन्य रोग पसरू नये यासाठी औषधांचे वाटपदेखील करण्यात आले. यावेळी शिव आरोग्य सेनेचे सरचिटणीस जितेंद्र सकपाळ, ठाणे जिल्हा संपर्क समन्वयक डॉ. प्रशांत भुईंबर, एकनाथ अहिरे, डॉ. राकेश यादव, अक्षता पांचाळ, अझीम शेख, फार्मसिस्ट सुशांत भुईंबर, शुभम, सानिया शेख उपस्थित होते.