
काँग्रेसचे नंदूरबार जिल्ह्याचे अध्यक्ष चंद्रकांत रघूवंशी यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. बुधवारी ‘मातोश्री’ येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवबंधून बांधून त्यांनी भगवा खांद्यावर घेतला. रघूवंशी यांच्यासह त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
वाचा पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे –
- आदित्य माझ्यापेक्षाही जास्त मेहनत करतोय – उद्धव ठाकरे
- दडपण नको म्हणून वरळीतील मेळाव्याला नव्हतो – उद्धव ठाकरे
- बाळासाहेब म्हणायचे या क्षेत्रात पुढे जायचे असेल तर तू माझा मुलगा म्हणून तुला शिवसैनिकांवर लादणार नाही आणि तू माझा मुलगा म्हणून तुला अडवणारही नाही. तू तुझे काम कर, शिवसैनिकांनी स्वीकारले तर तू पुढे जा – उद्धव ठाकरे
- युवकांनी पुढे येऊन देश आणि महाराष्ट्र घडवायला हवा – उद्धव ठाकरे
- आदित्यच नाही तर तमाम तरुणांनी स्वत: पुढे येऊन राजकारण हाती घ्यायला हवं – उद्धव ठाकरे
- 8 तारखेला दसरा मेळाव्यात सर्व गोष्टी बोलणार – उद्धव ठाकरे
- काही ठिकाणी निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू – उद्धव ठाकरे
- नंदूरबारवर भगवा फडकणारच – उद्धव ठाकरे
- नंदूरबारमध्ये प्रचाराला येणार – उद्धव ठाकरे
काँग्रेसचे नंदूरबार जिल्ह्याचे अध्यक्ष चंद्रकांत रघूवंशी यांनी @ShivSena मध्ये प्रवेश केला आहे. बुधवारी ‘मातोश्री’ येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवबंधून बांधून त्यांनी भगवा खांद्यावर घेतला. #ShivSena #MahaElection #महासामना #विधानसभा२०१९ pic.twitter.com/3qKrSHTLIw
— Saamana (@Saamanaonline) October 2, 2019
- चंद्रकांत रघूवंशी यांचे उद्धव ठाकरे यांनी केले शिवसेनेत स्वागत
- काँग्रेसचे नंदूरबार जिल्ह्याचे अध्यक्ष चंद्रकांत रघूवंशी यांया शिवसेनेमध्ये प्रवेश



























































