देशाचे तुकडे होणार असं बोलणाऱ्यांचे तुकडे देशातली जनता करेल – उद्धव ठाकरे

सामना ऑनलाईन । कोल्हापूर

शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची कोल्हापुरातील गडहिंग्लज येथे जाहीर सभा झाली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांची पिसे काढली.

कोल्हापूर सभेतील उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचे ठळक मुद्दे –

 • ममतांनी बांगलादेशमधून सिनेतारकाला बोलवण्यात आले. बांगलादेशी वासियांना हाताशी घेऊन खासदारांना निवडून आणणार?
 • आमच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी सिनेतारकांची गरज नाही.
 • आमच्या पक्षाचे एकच उमेदवार नरेंद्र मोदी. युती सरकारला हरवण्यासाठी 56 पक्ष एकत्र.
 • प्राण गेला तरी संभाजी महाराजांनी धर्मांतर केले नाही.
 • ओवैसीने संभाजीनगर मध्ये येऊन औरंगजेबाच्या समाधीवर डोके टेकवले.
 • निजामाला पाठिंबा देण्यासाठी एम आय एम पक्षाची स्थापना.
 • देशाचे तुकडे होणार असं बोलणाऱ्या खासदाराला आपण निवडून देणार?
 • देशाचे तुकडे होणार असं बोलणाऱ्याचे तुकडे देशातली जनता करेल.
 • काँग्रेस-राष्ट्रवादीचे मतदार हे देशाचे नागरिक आहेत. तुम्हाला देशद्रोह असणार कलम काढलेलं चालणार आहे का?
 • राष्ट्रवादी बोलतात पाच वर्ष एकमेकांशी भांडून शिवसेनेने भाजपला मिठी मारली. आम्ही उघडपणे युती केली.
 • भाजप शिवसेनेमध्ये मतभेद होते. नाणार प्रकल्प, मुंबईचा मुद्दा , राम मंदिर या मंदिरासाठी एकमत झाल्याने युती केली.
 • 60 वर्ष काँग्रेसने देशाला लुटले.
 • केंद्रात सरकार आपल्याला देशासाठी लढणाऱ्या जवानांसाठी पाहिजे.
 • ही या देशाची देशासाठी असणारी निवडणूक आहे.
 • देशाच्या गद्दाराला शिक्षा ही द्यायलाच हवी.
 • 124 अ हे देशद्रोह वरच कलम कोणावरही टाकणार नाही. असे कॉंग्रेस आपल्या जाहिरनाम्यात सांगते
 • देशासाठी शहीद होणार्‍या सैनिकाला विश्वास देणार त्याच्या पाठीशी उभा राहणार सरकार निवडून द्यायचे आहे.
 • देश म्हणजे काय ? आपण सर्वजण देश आहोत.
 • स्वाती महाडिक सारखी बहीण सैन्यात जाते. या सैन्याला हिम्मत द्यायला पाहिजे.
 • अयोध्येमध्ये पहिले मंदिर मग सत्ता. यासाठी हालचाली सुद्धा सुरू झालेल्या आहेत.
 • देव, देश आणि धर्मासाठी भाजप शिवसेनेने युती केली.
 • अशा या भगव्याची ही परंपरा आपण नाही राखायची तर कोणी राखायची.
 • प्रतापराव गुजरांचा छावणीवर हल्ला. अशा विरांचा हा कोल्हापूर जिल्हा आहे.
 • प्रतापराव गुजरांनी बहलोल खान याला गयावया केल्याने सोडले. शिवाजी राजांनी राज्याभिषेकावेळी बहलोलखान याला का सोडल्याने प्रतापराव गुजरांवरती संतापले.
 • स्वतःचा विचार न करता जनतेचा विचार करणारा खासदार पाहिजे. जनतेचे आशीर्वाद मंडलिक यांच्या पाठीशी.
 • आपलं ठरलंय इतकंच बोलून थांबायचं नाही आपल्याला करून दाखवायचे आहे.
 • सर्वसामान्यांमध्ये मिसळून जाणारा, संकटाशी सामना करणारा नेता संजय मंडलिक.
 • स्वातंत्र्यासाठी लढताना या राजाने अस्पृश्य समाज, गरीब जनता, बहुजनांसाठी काम केले.
 • जर एखादा वाघ गावकऱ्यांना त्रास देत असेल तरच त्याची शिकार करण्याचे काम शाहू महाराज यांनी केले.
 • कोल्हापूरच्या अंबाबाईनी आपलं गाऱ्हाणं ऐकलं आणि शाहू महाराजांसारखा पुत्र आपल्याला दिला.
 • शाहू, फुले, आंबेडकर हे काय होते, यांनी काय केले हे विरोधकांना माहित आहे का?
 • स्वाती महाडिक यांचे पती शहीद झाले. विरपुत्रा ची पत्नी यांनी जाहीर केले की माझा पती देशासाठी शहीद झाला यापुढे माझी मुले ही सैन्यातच भरती होतील. हे महाडिक आणि हे महाडिकमध्ये किती फरक आहे.
 • गोकुळचे मल्टीस्टेट करण्याचा डाव आपण उधळला आहे.