मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचाच महापौर बसेल! सुभाष देसाई यांचा ठाम विश्वास 

आजदेखील इतर पक्षांतील कार्यकर्ते  मोठय़ा संख्येने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश करत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात महाराष्ट्राच्या जनतेची जी सेवा केली आहे त्यावर विश्वास ठेवून येणाऱ्या काळात मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचाच महापौर निश्चित बसेल, असा ठाम विश्वास शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.

शिवसेना विभाग क्र. 2 चा मेळावा शिवसेना नेते सुभाष देसाई, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नुकताच पार पडला. यावेळी मुस्लिम बंधू-भगिनी, मनसे पदाधिकारी, काँग्रेस पदाधिकारी यांनी मोठय़ा संख्येने शिवसेनेत प्रवेश केला. मनसेचे महाराष्ट्र सचिव अश्विन धनावडे, काँग्रेसचे उत्तर मुंबई सचिव विनायक पाटील, आदिवासी समाजप्रमुख धर्मेश बर्ते, मुस्लिम समाजाचे बशीर बजिर यांनीदेखील हातात शिवबंधन बांधून हातात भगवा झेंडा घेत पक्षप्रवेश केला. यावेळी अंबादास दानवे यांनी कोरोना काळात शिवसेनेच्या शाखांमधून ज्याप्रकारे जनतेची सेवा सुरू होती त्याचा आवर्जून उल्लेख केला.

विभागप्रमुख सुधाकर सुर्वे यांनी  या कार्यक्रमाचे आयोजन  केले होते. विभाग संघटक मनाली चौकीदार, माजी नगरसेविका शुभदा गुडेकर, विधानसभाप्रमुख संतोष राणे, विधानसभा संघटक राजू खान, राजन निकम, मनोज मोहिते, उपविभागप्रमुख श्याम मोरे, भास्कर मोरे, अनंत नागम, रमाकांत ठाकूर, विधानसभा समन्वयक प्रदीप वस्त, विधानसभा निरीक्षक अभिषेक शिर्के, शाखाप्रमुख निखिल गुडेकर यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली. या कार्यक्रमास शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.