अयोध्येत भुमीपूजनापूर्वी लक्ष्मणगढीवर शिवसैनिकांकडून दीपोत्सव साजरा

3273

उद्या आयोध्येत राम मंदिरासाठी भूमीपूजन होणार आहे. त्यासाठी मुंबईतील शिवसैनिक स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरील माती घेऊन अयोध्येत पोहोचले आहेत. लक्ष्मणगढीवर शरयू नदी किनारी ही माती ठेवून शिवसैनिकांनी दिवे लावून दीपोत्सव साजरा केला आहे.

sharayu-river-soil-2

मीरा भाईंदरचे नगरसेवक विक्रम प्रतास सिंह हे अयोध्येत दाखल झाले आहेत. सिंह यांनी स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरील माती घेऊन लक्ष्मणगढी येथे शरयू नदी किनारी त्यांनी ठेवली आहे. या मातीजवळ त्यांनी 492 दिव्यांची आरास केली असून दीपोत्सव साजरा केला आहे.  उद्या राम मंदिराच्या भूमीपुजनाचा कार्यक्रम होत आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे एक स्व्वप्न साकार होत आहे. या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही तीन वेळा अयोध्येला भेट दिली होती. राम मंदिरासाठी शिवसेनेचे मोठे योगदान आहे. म्हणून शिवसैनिक आपल्या पद्धतीने या भूमीपुजनाच्या आनंद साजरा करणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या