हातकणंगलेतील शिरोलीमध्ये शिवभोजन थाळीचा शुभारंभ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोरगरिबांना अल्प दरात जेवण मिळावे, यासाठी महाविकास आघाडी सरकारने शिवभोजन थाळीची योजना सुरू केली. हातकणंगले तालुक्यातील शिरोलीमध्ये शिवभोजन थाळीचा शुभारंभ करण्यात आला आहे. सरपंच शशिकांत खवरे व मान्यवरांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. शिरोली फाटा येथील पंचवटी हॉटेलमध्ये थाळीचे वाटप करण्यात येणार आहे. सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत पाच रुपयात शिवभोजन थाळी मिळणार आहे. उद्घाटनावेळी उपसरपंच सुरेश यादव, मंडळ अधिकारी भरत जाधव, ग्रामविकास अधिकारी ए. एस. कठारे, तंटामुक्ती अध्यक्ष सतीश पाटील आदी उपस्थित होते.