
मध्य प्रदेश विधानसभेचा निकाल जाहीर होऊन सहा दिवस उलटल्यानंतरही भाजपने अद्याप मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार आहे, याची घोषणा केलेली नाही. अशातच शनिवारी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एक्स (ट्विटर) वर एक पोस्ट केली असून या पोस्टमधून सर्वांना ’राम राम’ केले आहे. चौहान यांच्या या पोस्टमुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. चौहान यांना पक्षश्रेष्ठाRनी आपला निर्णय कळवला आहे. त्यामुळे त्यांनी ’राम राम’ ही पोस्ट केली आहे. तसेच त्यांच्या या पोस्टचा अर्थ म्हणजे ते मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेतून बाहेर पडले आहे, असे बोलले जात आहे. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत 230 जागांपैकी भाजपला 163 जागा मिळाल्या असून स्पष्ट बहुमत मिळाले आहे.

























































