
सामना प्रतिनिधी, मुंबई
स्थानीय लोकाधिकार महासंघाच्या वतीने दिमाखदार शिवराय संचलनाच्या पूर्वतयारीची महत्त्वपूर्ण बैठक उद्या सोमवारी सायंकाळी 5 वाजता शिवसेना भवन, दादर येथे होणार आहे. स्थानीय लोकाधिकार महासंघाचे अध्यक्ष शिवसेना नेते-खासदार गजानन कीर्तिकर, कार्याध्यक्ष, शिवसेना नेते-खासदार आनंदराव अडसूळ, सरचिटणीस, शिवसेना सचिव-खासदार अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली शिवराय संचलनाची जोरदार तयारी करण्यात येत आहे. शिवराय संचलनाच्या नियोजनाबद्दल या बैठकीत सविस्तर चर्चा होईल.
नेमके कुठल्या प्रकारचे नियोजन करायचे, कुठल्या गोष्टींवर भर द्यायचा याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. याबाबत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सांगण्यात येईल. गजानन कीर्तिकर आणि अनिल देसाई या बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत. महासंघाचे सर्व पदाधिकारी आणि महासंघाशी संलग्न असलेल्या सर्व समित्यांतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी या बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन महासंघातर्फे करण्यात आले आहे.


























































