शिवसैनिकांचे सीना नदीपात्रात आंदोलन, अवैध वाळूउपशाविरोधात कारवाई करा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

भीमा व सीना नदीपात्रातून होणाऱया अवैध वाळूउपशाविरोधात तक्रार देऊनही महसूल प्रशासन कारवाई करीत नाही. वाळूमाफियांकर तातडीने कारकाई करावी, या मागणीसाठी मोहोळ शहरातील शिवसैनिकांनी आष्टा गावाजळील सीना नदीपात्रातील पाण्यात उभे राहून आंदोलन केले.

मोहोळ शहरप्रमुख विक्रम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सीना नदीत आंदोलन करण्यात आले. तहसील व पोलीस प्रशासनाने वाळूमाफियांविरोधात तातडीने कारवाई केली नाही, तर येत्या काळात मोठे जनआंदोलन उभे करू, असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला.

सीना नदीतून वाळूउपसा करू नये, असा आदेश पर्यावरण विभागाने काढला आहे. तरीही वाळूमाफियांचा वाळूउपसा सुरूच आहे. नदीमधून अनेक शेतकऱयांनी शेतीसाठी पाइपलाइनची व्यवस्था केली आहे. पण या वाळूउपशामुळे पाणीपातळी कमी होत चालली आहे. याचा परिणाम शेतीवर होत असल्याची तक्रार अनेक शेतकरी करीत आहेत.

सीना नदीपात्रातून मोठय़ा प्रमाणात वाळूउपसा सुरू असताना महसूल विभागातील कर्मचारी वाळूमाफियांकडे दुर्लक्ष करीत असल्याचेही शिवसैनिकांनी सांगितले. शिवसैनिकांनी सीना नदीपात्रात तब्बल चार तास पाण्यात उभे राहून वाळूउपशाविरोधात आंदोलन केले. मात्र, महसूल प्रशासनाचा कोणताही अधिकारी फिरकला नाही.