अलिबागमध्ये 14 ते 27 जुलैदरम्यान शिवसेनेचा भगवा पंधरवडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । अलिबाग

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने 14 जुलै ते 27 जुलैदरम्यान ‘भगवा पंधरवडा’ आयोजित करण्यात आला आहे. ‘गाव तेथे शाखा प्रमुख आणि घर तिथे शिवसैनिक’ ही संकल्पना घेऊन शिवसेना आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. अलिबाग मुरुड मतदारसंघाची मोर्चेबांधणी या भगवा पंधरावड्यात करण्यात येणार आहे.

रायगड जिल्ह्यातही भगवा पंधरवड्यानिमित्त विविध ठिकाणी बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. कुर्डुस जिल्हा परिषद मतदार संघातील सर्व शिवसेनेचे शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, महिला पदाधिकारी, संघटक, उपसंघटक, सर्व कामगार सेल, गटप्रमुख, युवासेनेचे सर्व पदाधिकारी व सर्व शिवसैनिक यांचा मेळावा आणि शिवसेना सभासद नोंदणी रविवारी होणार आहे. शिवसेना सहसंपर्क प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, शिवसेना माजी जिल्हा प्रमुख महेंद्र दळवी, विजय कवळे, अलिबाग तालुका प्रमुख राजा केणी, कामगार नेते दीपक रानावडे, अलिबाग मुरुड विधानसभा संघटक सतीश पाटील, तालुका संघटक सुशील पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मेळावा होणार आहे.

अलिबाग विधनासभा मतदारसंघात 14 जुलैला कुर्डूसमध्ये, 17 जुलैला चेंढरेमध्ये, 19 जुलैला चौलमध्ये, 20 जुलैला अलिबाग शहरात, 21 जुलैला शहापूरमध्ये, 24 जुलैला मापगावमध्ये, 26 जुलैला थळमध्ये तर 27 जुलैला बेलोशीमध्ये जिल्हा परिषद गटनिहाय मतदारंसघातील बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.