शिवसेनेचे पालिकेतील संख्याबळ झाले 94, महासभेत गीता भंडारी यांची नगरसेविका म्हणून घोषणा

394
bmc-2

महापालिकेत सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेचे संख्याबळ आता 94 झाले आहे. यामध्ये मालाड प्रभाग क्र. 32 मधील शिवसेनेच्या गीता भंडारी यांच्या नावाची अधिकृत घोषणा आज पालिकेच्या महासभेत महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांनी केली.

काँग्रेसच्या नगरसेविका स्टेफी किणी यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र अवैध असल्याच्या पार्श्वभूमीवर लघुवाद न्यायालयाने मालाड प्रभाग क्र. 32 मधील दुसर्‍या क्रमांकाच्या शिवसेना उमेदवार गीता भंडारी यांच्या बाजूने निवाल दिल्यामुळे भंडारी यांचा नगरसेविका होण्याचा मार्ग मोकळा झाला होता. पालिकेच्या 2017 च्या निकडणुकीत काँग्रेसच्या स्टेफी किणी मालाड प्रभाग क्र. 32 मधून निवडून आल्या होत्या, मात्र त्यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरवून फेटाळले होते. त्यामुळे किणी यांनी मुंबई उच्च न्यायालयातही आव्हान दिले होते. यावेळी मुंबई उच्च न्यायालयानेही आधी समितीच्या निर्णयाला स्थगिती दिली होती, मात्र नंतर पुन्हा उच्च न्यायालयाने ही स्थगिती उठकली क  स्टेफी किणी यांचे नगरसेककपद रद्द करण्यात आल्याचा निवाल डिसेंबर 2018 मध्ये दिला होता. त्यामुळे संबंधित प्रभागात दुसर्‍या क्रमांकाची मते मिळालेल्या शिकसेनेच्या उमेदवार गीता किरण भंडारी यांनी लघुवाद न्यायालयात धाव घेतली होती. वारण दुसर्‍या क्रमांकाची मते मिळणार्‍या नगरसेवकाला नगरसेवक म्हणून संधी देण्याचा अधिवार लघुवाद न्यायालयाला असतो.  या पार्श्वभूमीवर लघुवाद न्यायालयाने शिवसेनेच्या गीता भंडारी यांच्या बाजूने निवाल दिल्याने त्यांना नगरसेविका होण्याची संधी मिळाली आहे. दरम्यान, पालिकेत निवडून आलेल्या एकूण 227 नगरसेवकांपैकी भाजपच्या केसरीबेन पटेल, मुरजी पटेल, काँग्रेसचे राजपत यादव, विठ्ठल लोकरे, राष्ट्रवादीच्या सोफी जब्बार यांचे पद रद्द झाले आहे.

काँग्रेसचे जावेद जुनेजा स्थायी समितीवर

दरम्यान, काँग्रेसचे तत्कालीन नगरसेवक विठ्ठल लोकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने स्थायी समितीमधील त्यांच्या जागी काँग्रेसने नगरसेवक जावेद जुनेजा यांना संधी दिली आहे. त्यांची स्थायी समिती सदस्यपदी नियुक्ती झाल्याची घोषणाही आज महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांनी पालिकेच्या महासभेत केली.

 

सध्याचे संख्याबळ

शिवसेना        94

भाजप           83

काँग्रेस           27

राष्ट्रवादी        8

‘सपा’            6

मनसे             1

एमआयएम     2

आपली प्रतिक्रिया द्या