वाढीव बिल देणाऱ्या ‘अदानी’ला शिवसेनेचा दणका

1005

कोरोनाचा प्रभाव आणि लॉकडाऊनमुळे नोकरी, व्यवसाय डबघाईला आले असताना अदानी इलेक्ट्रिसीटीकडून ग्राहकांना हजारो रुपयांची वाढीव बिले पाठवण्यात आली आहेत. याची गंभीर दखल घेत शिवसेनेने दिंडोशी विभागाच्या अधिकाऱयांना निवेदन देत तातडीने वाढीव बिल मागे घ्या, अन्यथा जोरदार आंदोलन करू असा इशारा दिला.

अदानी इलेक्ट्रिसिटीकडून वीज ग्राहकांना तीन ते चार महिन्यांची बिले दंड आकारून आणि वाढीव पाठवण्यात आली आहेत. यामध्ये पाचशे ते आठशे रुपये येणारे बिल तीन हजार, बारा हजार, सतरा हजार रुपयांचे पाठवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना विभाग क्रमांक 2 च्या वतीने विभागप्रमुख सुधाकर सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली अदानी इलेक्ट्रिसिटी महाव्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले.

संदीप नाराळे, सुधाकर किदे दिंडोशी विभाग अधिकारी यांनी हे निवेदन स्विकारले. यावेळी विधानसभा संघटक संतोष धनावडे, उपविभागप्रमुख प्रदीप ठाकूर, शाखाप्रमुख सुभाष धानुका, सचिन देसाई, उत्तर भारतीय संपर्क प्रमुख ऍड. कमलेश यादव आदी उपस्थित होते. शिवसेनेने अदानी इलेक्ट्रिसिटी कार्यालयावर धडक दिल्यानंतर प्रशासनाने वाढीव बिले तातडीने कमी करू असे आश्वासन दिले.

आपली प्रतिक्रिया द्या