उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करा! हाथरस घटनेच्या निषेधार्थ शिवसेनेची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुलगी, बहीण, आई-माता युपीत रावणाने जाळली माता…बेटी पढाओ.. बेटी बचाओ देश का नारा… पर बेटी लुटो बेटी जलाओ यूपी मे योगी का नारा…अशा बुलंद घोषणा देत शिवसेनेच्या रणरागिणींनी आज शिवाजी पार्पवर उत्तर प्रदेशमधील हाथरस सामूहिक बलात्काराच्या घटनेचा तीव्र निषेध केला. संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी आणि रणरागिणींनी उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी पेंद्र सरकारकडे केली.

उत्तर प्रदेशमधील हाथरस सामूहिक बलात्काराचा निषेधार्थ शिवसेना आणि शिवसेनेच्या रणरागिणी प्रचंड आक्रमक झाल्या आहेत. विभागप्रमुख सदा सरवणकर यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी पार्प येथील माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ शिवसेनेने तीव्र आंदोलन केले. शिवसैनिक व महिला आघाडीच्या रणरागिणींनी उत्तर प्रदेशमधील योगी सरकारच्या निषेधाचे फलक आणि भगवे झेंडे घेऊन जोरदार घोषणा दिल्या. देश का नारा बेटी पढाओ बेटी बचाओ… यूपी योगी का नारा बेटी लुटो बेटी जलाओ तसेच मुलगी बहिण, आई माता… यूपीत रावणाने जाळली माता अशी पोस्टर्स फडकावत शिवसेनेच्या रणरागिणींनी योगी आदित्यनाथ सरकारला निषेध केला. उत्तर प्रदेशातील घटना अत्यंत दुर्देवी आहे. माणुसकीला काळिमा फासणारी आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणारे आता झोपेचे सोंग का घेत आहेत, उत्तर प्रदेशातील अत्याचाराच्या घटना त्यांना दिसत नाही का, असा संतप्त सवाल यावेळी शिवसेनेच्या रणरागिणींनी विचारला.

या संदर्भात शिवसेनेचे विभागप्रमुख व आमदार सदा सरवणकर म्हणाले की, माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यापासून चैत्यभूमीपर्यंत शिवसैनिकांनी व रणरागिणींनी लाँगमार्च काढला. चैत्यभूमीवर जाऊन भारतरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांना साकडे घातले. आपण दिनदुबळे व पददलितांना न्याय मिळवून दिला. आता हाथरसमधील अत्याचार पिडीत मुलीच्या पुटुंबियांना आता न्याय मिळवून द्या असे साकडे आम्ही घातले. या मुलीवर सामुहिक बलात्कार झाला. त्यानंतर पोलिसांनी तिच्या पुटुंबियांना घरात डांबून ठेवले आणि मुलीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. हा लोकशाहीवरचा सर्वात मोठा बलात्कार आहे. उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी असल्याचे सरवणकर म्हणाले.

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे दलित तरुणीवरील सामुहिक अत्याचार व हत्येचा तीव्र निषेध करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने शिवाजी पार्प येथील चैत्यभूमी तसेच माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे पुतळ्याजवळ निदर्शने करण्यात आली. योगी आदित्यनाथ सरकार बरखास्त करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्याप्रसंगी आमदार व विभागप्रमुख सदा सरवणकर, मनीषा कायंदे, माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्यासह शेकडो शिवसैनिक, पदाधिकारी उपस्थित होते.

युवासेनेच्या अधिपत्याखालील युवती सेनेच्या वतीनेही दादरच्या शिवसेना भवन येथे निदर्शने करण्यात आली. हाथरस बलात्कार घटनेबाबत उत्तर प्रदेश पोलिसांच्या अमानवी भूमिकेचा यावेळी तीव्र निषेध केला गेला. उत्तर प्रदेशातील भाजपा सरकारचा धिक्कार केला गेला. बलात्कारपीडित मुलीच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा अशी मागणीही करण्यात आली. याप्रसंगी युवा सेना कार्यकारिणी सदस्य सुप्रदा फातर्पेकर, सिनेट सदस्या शीतल देवरुखकर आणि युवती सेनेच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या.