पेणमध्ये शिवसेना शेतकरी मदत केंद्राचे उद्घाटन

42

सामना प्रतिनिधी । पेण

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी व त्यांना सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी शिवसेनेच्या 53 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून पेण येथील रेडऊड प्लाझा येथे शिवसेनेच्या वतीने शेतकरी मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. या शेतकरी मदत केंद्राचे उद्घाटन जिल्हा प्रमुख किशोर जैन यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख किशोर जैन, उपजिल्हा प्रमुख नरेश गावंड, तालुका प्रमुख अविनाश म्हात्रे, शहर प्रमुख ओंकार दानवे, महिला आघाडीच्या कल्पना पाटील, अवजड वाहतूक संघटनेचे अच्युत पाटील, वाहतूक सेनेचे दिलीप पाटील, अशोक वर्तक, जेष्ठ शिवसैनिक जनार्दन कडु, युवा सेनेचे चेतन मोकल, प्रसाद देशमुख, विजय पाटील, लकी बोहरा, ग्राहक संरक्षणचे नंदु मोकल, नरेश सोनवणे, सुरेंद्र सकपाळ, प्रकाश पाटील, प्रमोद घरत, प्रशांत पाटील, लव्हेंद्र मोकल, विशाल दोशी यांच्यासह शिवसैनिक व पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी महिला आघाडीच्या कल्पना पाटील यांच्या नेतृत्वाखाली पेण रामवाडी सुतारवाडी येथील महेंद्र मंचेकर, शेकडो महिला व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तसेच जिते येथील सार्वजनिक कार्यकर्ते बाळा म्हात्रे यांनीही किशोर जैन यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या समस्य सोडविण्याकरीता शिवसैनिकांनी कामाला लागावे, असे आदेश उपजिल्हा प्रमुख नरेश गावंड यांनी दिले.

आपली प्रतिक्रिया द्या