कमळाबाईची पालखी वाहायला मी शिवसेना निर्माण केली नाही! शिवसेनेकडून विरोधकांना सडेतोड प्रत्युत्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात ‘इंडिया’ आघाडीची वज्रमूठ घट्ट होत असल्याचा जबर धसका घेतलेल्या भाजप आणि मिंध्यांकडून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षविरोधात मुंबईत पोस्टरबाजी करून डिवचण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिवसेनेने त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. ‘मी कमळाबाईची पालखी वाहण्यासाठी शिवसेना निर्माण केली नाही,’ असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ठणकावले होते. त्या इशाऱ्याचे भलेमोठे पोस्टर शिवसेना भवन येथे लावण्यात आले आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून कारभाराचा गाढा उत्तमरीत्या हाकला जात असताना वर्षभरापूर्वी मिंध्यांनी अचानक केलेल्या गद्दारीमुळे राज्यात सत्तापरिवर्तन झाले. यानंतर निष्ठावंतांना नाहक डिवचण्याचा प्रयत्न मिंधे आणि भाजपकडून वेळोवेळी केला जात आहे. यामध्ये आता मुंबईत काही ठिकाणी ‘मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही – हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे’ अशा आशयाचे फलक झळकवण्यात आले आहेत. याला शिवसेनेकडून पोस्टरच्याच माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. हे पोस्टर सोशल मीडियातही व्हायरल झाले आहे.