शिवसेना जनतेच्या मदतीला तत्पर; शहापूरच्या ग्रामीण भागात 3000 कुटुबांना आधार

543

राज्यात कोरोनाचे संकट बिकट होत आहे. कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्या गोर- गरीब गरजूंची उपासमार होऊ नये म्हणून शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील 13 दिवसापासून पडघा ते कसारादरम्यान गरजूंना जेवण आणि अन्नधान्याचे वाटप करत आहेत. तर शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य तथा धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश म्हात्रे ( बाळ्या मामा) यांनी पुढाकार घेत शिवसेना उपजिल्हा प्रमुख संतोष शिंदे यांच्या मदतीने शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागात 3000 कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत मोठा आधार दिला आहे.

शहापूर तालुक्यातही कोरोनाचा सामना करत असता लॉकडाऊनमुळे सामान्य जनतेला विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. संचारबंदीमुळे सर्वकाही ठप्प असताना रोजगार बंद झाल्याने जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.अशा परिस्थितीत समाजकारणाचा वारसा असलेल्या शिवसेनेने शहापूर तालुक्यातील गोरगरीब, आदिवासी, गरजू बांधवांना मदत केली असून यामध्ये 15 टन तांदूळ, 3 टन तूरडाळ आणि 3 हजार लिटर खाद्यतेल या दररोजच्या लागणाऱ्या वस्तूंचे वाटप केले आहे. एकजूटीने कोरोनाचा सामना करू या , एकमेकांना सहकार्य करू या !! हा लढा धैर्याने लढू या!, असे आवाहन शिवसेनेच्या नेत्यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या