गावडेआंबेरेतील पूरग्रस्तांना शिवसेनेकडून मदत

589

पूरग्रस्तांसाठी शिवसेनेचे मदतकार्य सुरु आहे. रत्नागिरी तालुक्यातील गावडेआंबेरे गावातील पूरग्रस्तांचा विविध वस्तूंचे जिल्हापरिषद सदस्या आरती तोडणकर यांच्याहस्ते वाटप करण्यात आले. ऑगस्ट महिन्यात रत्नागिरी तालुक्यात अनेक गावांना पूराचा फटका बसला. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शिवसेना पुढे सरसावली आहे. शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत, शिवसेना उपनेते म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत आणि को-ऑपरेटिव्ह बँक एम्पॉलाईज युनियनचे कार्याध्यक्ष सुनील साळवी यांच्या सहकार्यातून हे मदतकार्य सुरु आहे. मदत वाटपाप्रसंगी शिवसेना तालुकासंघटक सुभाष पावसकर,विभागप्रमुख रविकिरण तोडणकर,पं.स.सदस्य सुनील नावले,सरपंच नम्रता आंबेरकर,विजय चव्हाण आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या