युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याला सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
सामना ऑनलाईन, नांदेड
शिवसेना नेते तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे आज दुपारी दीड वाजता नांदेड विमानतळावर आगमन झाले. दुष्काळग्रस्त भागाची पाहणी आणि शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आदित्य ठाकरे तीन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आले आहेत. विमानतळावर त्यांचे उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले.
आदित्य ठाकरे यांच्यासोबत युवासेनेचे वरुण सरदेसाई, सिध्देश कदम, पूर्वेश सरनाईक हे देखील मराठवाड्यामध्ये दाखल झाले आहेत.  नांदेड, हिंगोली जिल्ह्याचे संपर्कप्रमुख आनंदराव जाधव, कोअर कमिटीचे सदस्य विपुल पिंगळे, डॉ.गणेश राजे भोसले, नांदेडचे विस्तारक अमित गिते, शिवसेना आमदार हेमंत पाटील,आमदार डॉ.जयप्रकाश मुंदडा, आमदार दिप्लव बाजोरीया, जिल्हाप्रमुख आनंदराव बोंढारकर, दत्ता कोकाटे, उमेश मुंडे, हिंगोलीचे शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर, जिल्हा समन्वयक धोंडू पाटील, मुक्तेश्वर धोंडगे, नगरसेवक बालाजी कल्याणकर शिवसेनेचे सर्व तालुकाप्रमुख, युवासेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसेनेच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आदित्य ठाकरे आणि सहकाऱ्यांचे स्वागत केले.