
महापालिकेच्या विलेपार्ले पश्चिम येथील कूपर रुग्णालयात डॉक्टरांच्या कमतरता, अपुरा औषधसाठा, रिक्त पदे, सुरक्षारक्षकांची कमतरता यामुळे उपचारासाठी येणाऱया गोरगरीब रुग्णांना नाहक मनःस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे या गैरसोयी तातडीने दूर कराव्यात, अशी जोरदार मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अंधेरी पश्चिम विधानसभेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत आज रुग्णालयाचे डीन शैलेश मोहिते यांना निवेदन देण्यात आहे.
यावेळी अंधेरी पश्चिम किधानसभेचे संघटक संजय कदम, शाखाप्रमुख संजय साखळे, संजय जाधक, उपकिभागप्रमुख शरद जाधक, माजी नगरसेकिका ज्योत्स्ना दिघे, माथाडी पदाधिकारी गणेश महाडिक, किरण कादळ, लखन कोळी तसेच आदी पदाधिकारी क शिवसैनिक उपस्थित होते.

























































