शिवसेना धुळे महानगरचा आज निर्धार मेळावा

903
file photo

येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे शहर मतदारसंघाच्या कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा मंगळवारी  दुपारी साडेचार वाजता होत आहे. शहरातील संतोषी माता मंदिराजवळ सैनिक लॉन्समध्ये हा मेळावा होणार आहे. मेळाव्याला शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात, पालकमंत्री दादा भुसे मार्गदर्शन करणार आहेत. मेळाव्यास शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना महानगर शाखेने केले आहे.

मेळाव्याच्या व्यासपीठावर सहसंपर्कप्रमुख अतुल सोनवणे, जिल्हाप्रमुख हिलाल माळी, हेमंत साळुंके, महिला संपर्क संघटक प्रियंका घाणेकर, माजी जिल्हाप्रमुख भुपेंद्र लहामगे, राजेंद्र पाटील, भगवान करनकाळ, महेश मिस्तरी, महिला संघटक कविता क्षीरसागर, हेमा हेमाडे उपस्थित राहणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी 14 सप्टेंबरनंतर आचारसंहिता जारी होण्याची शक्यता आहे.  त्यादृष्टीने धुळे शहरात शिवसेनेची मोर्चेबांधणी सुरू आहे. धुळे शहरामध्ये शिवसैनिकांची काम करण्यासाठी आक्रमक फौज  तयार आहे. अनेक विद्यमान आमदार शिवसेना-भाजपात प्रवेश करत आहेत. विरोधी पक्षांनी सत्ताप्राप्तीची आशा सोडल्यामुळे त्यांचे नेते युतीमध्ये दाखल होत आहेत. येणाऱया काळात महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचे सरकार राहील, असा आत्मविश्वास युतीच्या नेत्यांना आहे.

वर्षभरापासून महानगर शाखेतर्फे बुथ प्रमुखांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. नवीन रचनेप्रमाणे प्रत्येक प्रभागात चार शाखाप्रमुखांची नेमणूक करण्यात आली आहे. शहरामध्ये शिवसेना पदाधिकाऱयांची मजबूत फळी निर्माण झाली आहे. त्या बळावर धुळे शहर विधानसभा निवडणुकीत भगवा फडकवण्याचा संकल्प करण्यासाठी मंगळवारी गटप्रमुख, बुथप्रमुख, शाखाप्रमुख, शाखा उपप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, आजी-माजी पदाधिकाऱयांसाठी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्यास उपस्थित राहण्याची विनंती माजी आमदार प्रा. शरद पाटील, जिल्हा उपप्रमुख धीरज पाटील, महानगरप्रमुख नरेंद्र परदेशी, संजय गुजराथी, महानगर संघटक विजय भट्ट, विधानसभा क्षेत्रप्रमुख डॉ.सुशील महाजन, माजी विरोधी पक्षनेते गुलाब माळी, गंगाधर माळी, रवी काकड, एस.टी.कामगार सेनेचे हेमराज साळुंके, वाहतूक सेनेचे नरेंद्र अहिरे, भूषण पवार, शिव वाहतूक सेनेचे पंकज भारस्कर, वकील संघटनेचे ऍड.राजेंद्र गुजर, युवासेनेचे पंकज गोरे, महानगर उपप्रमुख देविदास लोणारी, प्रफुल्ल पाटील आदींनी केली आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या