संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत 5 सप्टेंबरपर्यंत वाढ करण्याचे आदेश आज सत्र न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी दिले.

खासदार राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत आज संपल्याने त्यांना सकाळी सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. खासदार राऊत यांची चौकशी अजूनही सुरू आहे. त्यामुळे कोठडी वाढवून मिळावी, अशी मागणी ईडीने केली. न्यायाधीशांनी राऊत यांची कोठडी 14 दिवसांपर्यंत वाढवली.

लवकरच जामिनासाठी अर्ज
जामीन मिळावा यासाठी येत्या काही दिवसांत सत्र न्यायालयात अर्ज करू, अशी माहिती संजय राऊत यांचे वकील विक्रांत साबणे आणि आमदार सुनील राऊत यांनी दिली.