अवास्तव वीज बिल… सेवासुविधांचा अभाव, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाची अदानी इलेक्ट्रिसिटीवर धडक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबई उपनगरात सध्या अदानी कंपनी वीजपुरवठा करत आहे. वीज बिल दराच्या संदर्भात ग्राहक अदानी इलेक्ट्रिसिटीकडे आशेने पाहत असताना अवास्तव बिल पाठवून या कंपनीने ग्राहकांचा भ्रमनिरास केला आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाने नुकतीच अदानी इलेक्ट्रिसिटीवर धडक दिली आहे.

ग्राहकांच्या तक्रारीनंतर शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे सरचिटणीस अॅड. अरुण जगताप आणि त्यांच्या शिष्टमंडळाने अदानी इलेक्ट्रिसिटीच्या कार्यालयावर धडक देत उपाध्यक्ष (पूर्व क्षेत्र) नितीन काटे, उपमहाव्यवस्थापक सतीश चिवटे, महाव्यवस्थापक मानव संसाधन नित्यानंद तिवारी यांची भेट घेतली. कमी वापर व जास्त वापर युनिट दर नियंत्रित करण्यात यावेत, अंदाजित वीज बिल व निर्धारित वीज बिल यातील फरक सांकेतिक खूण अथवा मीटर रीडिंग दर्शवत बिलावर छापावा अशा काही मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन उपाध्यक्ष काटे यांनी शिष्टमंडळाला दिले. यावेळी शिष्टमंडळात कार्यकारिणी सदस्य सुनील बागवे, कक्षप्रमुख शोभा देसाई, सुनील वेंगुर्लेकर, अनिल तर्फे, राजेश साटम, युवराज हांडे, प्रजेश कदम, राम महाडेश्वर, उल्हास चवाथे, राजेश गावडे आदी उपस्थित होते.