मेट्रो 2 ब मधून कुर्ला र्टिमनल वगळले, शिवसेनेने विचारला ‘एमएमआरडीए’ला जाब

‘एमएमआरडीए’ प्रशासनाने अचानकपणे मेट्रो 2 ब मधून कुर्ला टर्मिनल मेट्रो स्थानक वगळल्यामुळे स्थानिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. याची दखल घेत शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांनी आज मेट्रोचे प्रकल्प संचालक पीआरके मूर्ती यांची तातडीने भेट घेऊन याबाबत जाब विचारला.

डी. एन. नगर ते मंडाळे या दरम्यानची दोन स्थानके ‘एमएमआरडीए’तर्पâे अचानक वगळण्यात आली असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या तक्रारीनंतर समोर आले. या पाश्र्वभूमीवर, शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर आणि अनिल गलगली यांनी मेट्रो अधिका-यांची भेट घेतली. यावेळी कुडाळकर यांनी सविस्तर चर्चा करत अचानक कुर्ला टर्मिनल वगळण्यात आल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच कुर्ला पूर्व येथील इमारत क्रमांक 81, 82 आणि 83 या इमारती मेट्रो 2 ब मुळे प्रभावित होत आहे त्या इमारतीचा विकास लवकरात लवकर करण्याची आग्रही मागणी केली. कुर्ला पूर्व येथील मेट्रो स्थानक परिसर सुशोभित करत सर्व अडथळे दूर करण्याचीही मागणी केली. दरम्यान, अनिल गलगली यांनी दोन वेळा मूळ आराखड्यात केलेल्या बदलाबाबत आश्चर्य व्यक्त केले. हे बदल केल्यामुळे ‘एमएमआरडीए’ने सर्वंकष प्रकल्प अहवाल (Dझ्R) बनवण्यासाठी सल्लागाराला दिलेले कोट्यवधी रुपयांचे शुल्क वसूल करावे, अशी मागणी गलगली यांनी केली. यावेळी मेट्रोचे अधीक्षक अभियंता श्रीकांत जाधवसुद्धा उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या