शिवसेनेकडून नगराध्यक्षपदासाठी राजू देवळेकर यांच्यासह नगरसेवक पदासाठी 12 जणांचे अर्ज दाखल

चिपळूण नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शनिवारी नगराध्यक्षपदासाठी राजेश उर्फ राजू देवळेकर यांच्यासह नगरसेवक पदासाठी १२ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले. शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांच्या सुकन्या कांचन सुमित शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला.

शिवसेनेकडून नगरसेवक पदासाठी १२ उमेदवारांनी अर्ज भरले. त्यामध्ये संकेत शिंदे, कांचन शिंदे, शैलेश टाकळे, सपना पवार, निकेत हरवंदे, संजय गोताड, सानिका टाकळे, राहुल लोटेकर, गणेश फके, मिथिलेश नरळकर, मोहन मिरगल आणि अजय भालेकर यांचा समावेश आहे. यावेळी शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव, तालुकाप्रमुख बळीराम गुजर, क्षेत्रप्रमुख बाळा कदम, भय्या कदम आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून रमेश कदम यांनी आणि कॉंग्रेसकडून लियाकत शहा यांनीही नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरले आहेत.

नगराध्यक्षपदासाठी आज तीन उमेदवार इच्छुक आहेत. ते तिघेही आज इथे उपस्थित आहेत. तिघांपैकी महाविकास आघाडीचा एक उमेदवार निश्चित करण्यासाठी आम्हाला फार कष्ट घ्यावे लागणार नाहीत.
– भास्कर जाधव, शिवसेना नेते, आमदार