
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उद्या महाडमध्ये विराट जाहीर सभा होणार आहे. महाडमधील चांदे क्रीडांगणावर सायंकाळी 6 वाजता ही सभा होणार असून या सभेत उद्धव ठाकरे गद्दार मिंधे गटाचा आणि भाजपचा कसा समाचार घेतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. काँग्रेस नेते, माजी आमदार माणिकराव जगताप यांची कन्या व माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप, माणिकराव यांचे बंधू हनुमंत जगताप हे यावेळी असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
स्थळ : चांदे क्रीडांगण, महाड
वेळ : सायंकाळी 5.30 वा.




























































