हवालदिल शेतकर्‍यांना साथ देण्यास शिवसेनेचे प्राधान्य – एकनाथ शिंदे

1022

परतीच्या पावसामुळे संभाजीनगर जिल्ह्यासह राज्यातील शेतकर्‍यांचे हातचे पीक वाया गेले. हवालदिल शेतकर्‍यांना साथ देण्यासाठी शिवसेनेचे प्रथम प्राधान्य असल्याचे वचन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. गंगापूर तालुक्यातील सिद्धनाथ वाडगाव येथील शेतात पीक नुकसानीची पाहणी करत असताना त्यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधला.

गंगापूर तालुक्यातील सिद्धनाथ वाडगाव व परिसरातील शेतकर्‍यांच्या पिकांचे परतीच्या पावसाने अतोनात नुकसान झाले आहे. प्रत्यक्ष शेतावर जाऊन पालकमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई यांनी भेट देऊन पाहणी दिली. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे, आमदार रमेश बोरनारे, आमदार प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी आदींसह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

यावेळी दिलीप राजपूत यांच्या शेतात जाऊन कापूस, मका, बाजरी, सोयाबीन, ज्वारी, हरभरा आदी पिकांची परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे प्रत्यक्ष पाहणी करून शेतकर्‍यांशी संवाद साधला. झालेले नुकसान कधीही न भरून येणारे आहे. आम्ही पुरते बरबाद झालो आहे, असे सांगताना शेतकर्‍यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकर्‍यांना धीर देत शिवसेना आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, पक्ष आपल्याला वार्‍यावर सोडणार नाही. नुकसान झालेल्या पिकांची भरपाई मिळवून देणारच, असे वचन दिले. संबंधित अधिकार्‍यांनी नियमांची सबब न सांगता शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन पिकांचे पंचनामे करावे, असे आदेश जिल्हाधिकारी, कृषी अधिकारी, विमा कंपनी व तहसीलदारांना दिले.

आपली प्रतिक्रिया द्या