50 हजार दिव्यांनी साकारले शिवसेनाप्रमुख

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त कलाकार चेतन राऊत यांनी पवई येथे 50 हजार मातीच्या दिव्यांपासून शिवसेनाप्रमुखांचे पोर्ट्रेट साकारले आहे. पवईच्या आयआयटी मुंबईजवळील माता रमाबाई नगरातील महानगरपालिका शाळेजवळील हरिश्चंद्र मैदानात हे पोर्ट्रेट साकारण्यात आले आहे. त्यासाठी सहा रंगछटा असलेले दिवे वापरण्यात आले आहेत. 40 फूट लांब आणि 30 फूट रुंद आकारचे हे पोर्ट्रेट साकारण्यासाठी चेतन आणि त्यांच्या टीमला 9 तास लागले.