
सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उरण शहर शाखेच्या वतीने सामाजिक, शैक्षणीक व आरोग्य विषयक भव्य कार्यक्रमांचे आयोजन शनिवार २८ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता सेंटमेरी हायस्कुल पटांगण येथे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय अवजड मंत्री अनंत गीते, खासदार श्रीरंग बारणे, संपर्कप्रमुख संजय मोरे, आमदार भरत गोगावले, आमदार मनोहर भोईर, बबन पाटील, रेखा ठाकरे, दिनेश पाटील, नरेश रहाळकर आदींसह अनेक मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा सत्कार, मोफत वह्या वाटप, लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत नेत्र चिकित्सा हॉस्पिटलचे उदघाटन, ज्येष्ठ शिवसैनिक कै. बा. सो. ठाकूर गुरुजी वृत्तपत्र वाचनालयाचे उदघाटन, विद्यार्थ्यांना मोफत टॅबचे वाटप, शहर शाखेच्या नूतनीकरण केलेल्या इमारतीचे उदघाटन, शहरातील प्रत्येक प्रभागात मोफत वह्या वाटप आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे आयोजन उरण शहरप्रमुख विनोद म्हात्रे, उनपाचे गटनेते गणेश शिंदे यांनी केले आहे.





























































