इतका मूर्ख कर्णधार मी आजवर पाहिला नव्हता! शोएब अख्तरची सरफराजवर आगपाखड

246

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पाकिस्तानविरुद्ध वर्ल्डकपमध्ये सातवा पराभव सहन करावा लागल्याने पाकड्यांच्या बुडाला आग लागली आहे. क्रीडा प्रेक्षकांसह माजी खेळाडूंनी पाकिस्तानचा संघ आणि कर्णधाराला धारेवर धरले आहे. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज आणि रावळपिंडी एक्सप्रेसच्या नावाने ओळखला जाणारा शोएब अख्तर याने तर पाकिस्तानच्या कर्णधाराची लक्तरे वेशीवर टांगली आहेत.

नाणेफेकीचा कौल जिंकून अर्धी लढत आपल्या बाजूने झुकवण्याची नामी संधी गमावणारा सरफराज अहमदसारखा मूर्ख पाकिस्तानी कर्णधार मी आजवर पंक्तीला नव्हता, अशी आगपाखड पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने पाकिस्तानच्या रविवारच्या दारुण पराभवानंतर केली. नाणेफेक जिंकल्यावर फलंदाजी घेण्याऐवजी क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा मूर्ख निर्णय घेत सरफराजने पराभव ओढवून घेतला. कारण मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्याची कुवत पाकिस्तानी संघात नाही हे त्याला कळायला हवे होते, असे ताशेरेही शोएबने मारले.

शोएब अख्तर पाकिस्तानी अपयशामुळे फार खवळला असून त्याने युटूबवर नाराजीचा व्हिडीओ टाकत कर्णधार सरफराज अहमदची कानउघाडणी केली. तो म्हणाला, ‘सरफराजच्या मूर्ख नेतृत्वामुळे पाकिस्तानी संघाला रविवारी मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. सरफराजला कळायला हवे की, 1999 ला इंझमाम, युसूफ, शाहिद आफ्रिदीसारखे धडाकेबाज फलंदाज संघात असताना आपला संघ 227 धावांचा पाठलाग करू शकला नव्हता. मग आताच्या संघाच्या बाबत तर आनंदी आनंदच आहे. टॉस जिंकून पहिली फलंदाजी घेतली असती तर हिंदुस्थानवर दबाव टाकून विजयासाठी संघर्ष सहज करू शकलो असतो.’

आपली प्रतिक्रिया द्या