तरुणाने हातावर गोंदला बारकोड, कारण ऐकून विचारात पडाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑनलाईन पेमेण्टचा जमाना आहे. त्यामुळे अलिकडे फोनवरुनच पेमेण्ट करणे सोयीचे ठरते. पण सतत फोन करुन पेमेण्ट करण्याचा एका तरुणाला कंटाळा आला आणि त्याने अनोखी शक्कल लढवली. त्याने आपल्या हातावरच बारकोडचा टॅटू गोंदवून घेतला आहे.

तायवानच्या एका व्यक्तीने हैराण करणारी गोष्ट केली आहे. ज्याचा कोणी विचारही करु शकत नाही. त्याने ऑनलाईन पेमेण्ट करण्यासाठी आपल्या हातावरच बारकोडचा टॅटू काढला आहे. दरवेळी फोन काढून स्कॅन करणे त्याला फार कंटाळवाणे वाटत होते. वारंवार पेमेण्ट करण्यापासून सुटका मिळविण्यासाठी त्याने असे केले आहे.

नुकत्याच एका वृत्तानुसार, तायवानच्या या तरुणाने सतत मोबाईल काढून पेमेण्ट करण्यासाठी फोन वारंवार काढावा लागत होता. त्यामुळे तो त्रस्त झाला होता. मात्र त्यानंतर त्याने एक शक्कल लढवली. त्याने आपल्या हातावर आपल्या बारकोडचा टॅटू काढून घेतला, त्यामुळे आता केव्हाही त्याला पेमेण्ट करायचे असते त्यावेळी तो हात दाखवतो. या तरुणाची ओळख उघड करण्यात आलेली नाही. मात्र तो तायवानमध्ये लोकप्रिय झालेला आहे. त्याची ओळख सोशल मीडीया प्लॅटफॉर्म डीकार्डवर व्हायरल झाली आहे. सोशल मीडीया अॅपवर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये त्या तरुणाने सांगितले की, भरपूर दिवसांपासून टॅटू बनविण्याबाबत विचार करत होता. त्याचवेळी बारकोडचा टॅटू बनविण्याचे डोक्यात आले.