मुंबई-पुणे मार्गावर आठ कि.मी.चा शॉर्टकट

1999

मुंबई-पुणे प्रवास आणखीन वेगवान करण्यासाठी खालापुरातील आडोशी ते लोणावळाच्या सिंहगड कॉलेजपर्यंत मिसिंग लिंक तयार करण्याच्या कामाचा शुभारंभ झाला आहे. आडोशी ते सिंहगड  कॉलेजजपर्यंत आठ किलोमीटर अंतर पार करण्यासाठी दोन मोठे बोगदे पाडून भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहे. शिवाय आडोशी व गारमाळ या भागात दोन महाकाय पूलही उभारले जाणार आहेत. त्यामुळे पनवेल ते पुणे हे अंतर 12 किमीने आणि अर्ध्या तासाने कमी होणार आहे. सुमारे साडेसात हजार कोटी रुपये खर्च करून एमएमआरडीसी हा प्रकल्प दोन वर्षांत पूर्ण करणार आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील  सुमारे  12 ते 13 किलोमीटरचा मार्ग बोरघाटातून गेला आहे. या परिसरात अनेक नागमोडी वळणे तीव्र चढ उताराची आहेत. या घाटमाथा क्षेत्रात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने परिसरात दरडी कोसळण्याच्या घटना घडत असून  हजारो जीवघेण्या अपघातात अनेकांचा मृत्यू झाला आहे, तर शेकडो जायबंदी झाले आहेत. घाटमाथा परिसरात वाहतूककोंडी हा नित्याचा विषय बनला असल्याने या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी रस्ते विकास महामंडळाने  हा प्रकल्प हाती घेतला आहे. शिवसेना नेते, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते खालापुरातील आडोशी बोगदा ते लोणावळा येथील सिंहगड  कॉलेज अशा आठ किलोमीटर अंतरात मिसिंग लिंक कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणे, एमएसआरडीसी सहव्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड, चंद्रकांत पुलपुंडवार यांच्यासह अधिकारीवर्ग उपस्थित होते.

आडोशी बोगदा ते सिंहगड  कॉलेज अशा आठ किलोमीटर अंतरात मिसिंग लिंक तयार करण्यात येणार आहे.

साडेसात हजार करोड रुपयांचे खर्चाचे काम येत्या दोन वर्षांत पूर्ण करण्याचा संकल्प एमएसआरडीसीने केला आहे.

आठ किलोमीटर अंतराच्या या कामात दोन महाकाय बोगदे तसेच चावणी गावाजळील 1800 मीटर खोल दरीवर चार किमीचे दोन केबल स्टेड पूल बांधण्यात येणार आहेत.

 

आपली प्रतिक्रिया द्या