मी राजकारणात जाऊ का ? माजी पोलीस अधिकाऱ्याचा फेसबुकवरून सवाल

1115

माजी सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे हे निवृत्तीनंतर राजकारणात येणार असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. या चर्चा सुरू असतानाच बर्गे यांनी फेसबुकवर एक पोस्ट अपलोड केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी प्रश्न विचारला आहे की “मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे मी राजकारणात प्रवेश करू का नको? मला तुमचे स्पष्ट मत जाणून घ्यायचे आहे “

भानुप्रताप बर्गे हे सहाय्यक पोलीस आयुक्त पदावरून निवृत्त झाले आहेत. धाडसी अधिकारी म्हणून त्यांची ओळख महाराष्ट्राला आहे. बर्गे यांनी त्यांच्या कारकिर्दीत 19 पेक्षा अधिक एन्काऊंटर केले असून त्यांच्या नावाने गुंड चळाचळा कापत होते. मुंबईतील लोखंडवाला चकमकीत माया डोळससह 7 गुंडांना पोलिसांनी यमसदनी पाठवले होते. चकमक करणाऱ्या या पोलिसांच्या पथकात बर्गे यांचाही समावेश होता. पोलीस दलात असताना बर्गे यांनी काही काळ शिवसेनाप्रमुख हिंदूहृदय बाळासाहेब ठाकरे यांचा अंगररक्षक म्हणूनही काम केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या