
कोणताही पदार्थ तळून झाल्यानंतर तेल राहिल्यास ते तेल पुन्हा वापरणे हितावह आहे का असा प्रश्न अनेकांना पडतो. परंतु असे तेल वारंवार वापरणे हे हितावह नसते. मर्यादित प्रमाणात अशा तेलाचा वापर हा योग्य मानला जातो. वारंवार असे तेल आरोग्यासाठी वापरणे हानिकारक ठरू शकते. म्हणूनच पुरी किंवा भजी तळून राहिलेले तेल कसे वापरावे याकरता काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
उन्हाळ्यात तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्यामुळे काय फायदे होतात
पुरी तळल्यानंतर तेलात कण (पीठाचे तुकडे) राहतात. ते गाळून काढणे आवश्यक आहे, नाहीतर ते जळून तेल खराब होते. तेल जास्तीत जास्त एकदाच पुन्हा वापरणे योग्य. वारंवार गरम केल्याने तेलात ट्रान्स फॅट आणि हानिकारक घटक तयार होतात.
तेलाचा रंग खूप गडद झाला असेल, धूर जास्त निघत असेल किंवा वास बदलला असेल तर ते न वापरणे अधिक योग्य. तेल पूर्ण थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवावे. तळलेले तेल पुन्हा वापरल्याने, हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. तसेच यामुळे पचनाचा तासही उद्भवू शकतो. असे तेल आहारात वापरल्याने शरीरावर सूजही येऊ शकते.
तळलेले तेल वापरण्याचा उत्तम पर्याय म्हणजे भाज्यांना फोडणी देण्यासाठी हे तेल वापरणे उत्तम. पराठा किंवा थालीपीठ भाजण्यासाठी असे तेल वापरणे हितावह आहे. परंतु पुन्हा भजी किंवा पुरी तळण्यासाठी असे तेल वापरु नये. आरोग्याच्या दृष्टीने तेल पुन्हा पुन्हा वापरणे टाळावे. शक्यतो ताजे तेल वापरणेच सुरक्षित.
























































