
बिहार राज्यातील मजुरांसाठी जालना स्थानकातून विशेष मोफत रेल्वेची सोय करण्यात आली आहे. शुक्रवारी सायंकाळी ही रेल्वे सुटणार असून छपरा हे शेवटचे रेल्वे स्थानक असणार आहे.
जालना शहरातील बिहार येथे जाणार्या नागरिकांना प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येते की, त्यांनी एक वाजता आयटीआय कॉलेज, चंदनझिरा, जालना याठिकाणी उपस्थित राहावे. येथून त्यांना रेल्वे स्थानकापर्यंत शासकीय बसने पोहचविण्यात येईल. तसेच तालुका स्तरावरुन बिहार येथे जाणार्या नागरिकांनी संबंधीत तहसिल कार्यालयात सकाळी 11 वाजता उपस्थित राहावे. तेथून त्यांना जालना रेल्वेस्थानकावर आणण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या विशेष रेल्वेसाठी नोडल अधिकारी म्हणून राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प संचालक मनोज देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.



























































