
काष्टी गावातील तीन तरुणांचा रविवारी रात्री दौंड पाटस रस्त्यावर वायरलेस फाट्यानजीक उसाच्या ट्रॅक्टरला धडकून झालेल्या अपघातात मृत्यू झाला आहे.
ऋषिकेश महादेव मोरे (वय 26 )स्वप्निल सतिष मनुचार्य (वय24),गणेश बापु शिंदे (वय 25) अशी अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. हे तिन्ही तरुण काष्टी गावातील बाजारतळ परिसरात राहत होते. घटनेमुळे संपूर्ण काष्टी गावावर शोककळा पसरली असून गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे प्राथमिक माहिती समजली आहे. या अपघातामुळे पुन्हा एकदा विना रिफ्लेकटर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनावर कडक कारवाईचा मुद्दा समोर आला आहे

























































