कश्मीरमध्ये फुटीरतावाद्यांनी पुकारला बंद, जनजीवन विस्कळीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर 

जम्मू कश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात स्फोट होऊन सात जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या निषेधार्थ फुटीरतावादी नेत्यांनी बंद पुकारला आहे. त्यामुळे कश्मीर खोर्‍यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीनगरमधील दुकानं, खाजगी कार्यालये, पेट्रोल पंप बंद आहेत. रस्त्यांवरही सरकारी गाड्या धावल्या नसून खाजगी वाहनांची रेलचेल होती. बुंद पुकारल्यामुळे सरकारी कर्मचार्‍यांनी घरीच राहणे पसंत केले. श्रीनगरमध्ये सुरक्षेचा उपाय म्हणून चौका चौकात पोलीस उभे आहेत.

दक्षिण कश्मीरमधील कुलमाग जिल्ह्यातील लारलू भागात सुरक्षादल आणि अतिरेक्यांमध्ये चकमक उडाली होती. अतिरेक्यांना कंठस्नान घातल्यानंतर स्थानिक लोक तिथे जमा झाले आणि अचानक तिथे एक स्फोट झाला. या स्फोटात सात जणांचा मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ सय्यद अली शह गिलानी, मीरवाईज उमर फारूक आणि मोहम्मद यासीन मलिक या फुटीरतावादी नेत्यांनी हा बंद पुकारला. या बंदला कश्मीरी पंडीतच्या संघटनांनीही पाठिंबा दिला आहे. या बंद मुळे काही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.