
सामना ऑनलाईन। श्रीनगर
हिंदुस्थानाने आपल्याकडील अणुबॉम्ब दिवाळीसाठी ठेवलेले नाहीत असे वक्तव्य रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानात प्रचारसभेत केले.
यावरून पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. पाकिस्ताननेदेखील अणुबॉम्ब ईदसाठी ठेवलेला नाही अशी तिरकस टीका मुफ्ती यांनी मोदी यांच्यावर केली. मोदी हे टीका करताना अत्यंत खालच्या पातळीवर जातात अशा शब्दांत मुफ्ती यांनी मोदी यांच्या भाषणाबद्दल नाराजी व्यक्त केली.























































